३१ डिसेंबरला 'दारू नको दूध प्या' : कोऱ्हाळे येथील युवकांचा अभिनव उपक्रम

Admin
३१ डिसेंबरला 'दारू नको दूध प्या' : कोऱ्हाळे येथील युवकांचा अभिनव उपक्रम

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र 31 डिसेंबर विधायक दारू नको दुध प्या हा उपक्रम बारामती तालुक्यातील को-हाळे पंचक्रोशीतील तरूण युवकांनी संपूर्ण दिवसभर राबविला.
          आजच्या तरुण पिढीतील तरुणांच वाढत व्यसनाच प्रमाण पाहता महासत्ता होऊ घातलेल्या नवभारताची खुप मोठी शोकांतिका आहे कारण आज ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील घरातील जवळपास घरटी एक तरुण व्यसनाधीन झालेला आढळतोय दूर्दैव म्हणजे यात मुली देखील कमी नाहीत दारु,तंबाखू,गांजा,चरस अशा शरिराला घातक असणार्या व्यसनाच्या आहारी गेलीली आहेत.
         को-हाळे गावातील हा 'दारु नको दुध प्या'  नावाने उपक्रम राबवून स्वखर्चाने दूध गरम करुन एक आगळा वेगळा उपक्रम राबवून तरूण मुलाना एक आगळावेगळा संदेश दिला. व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते आनिल खोमणे (रामकृष्ण ) दत्तात्रय गावडे नंदकुमार खोमणे सुरज माळशिकारे तानाजी पानगे सागर भगत सुरज जाधव कल्याण घोडे, भोसले आदींनी हा उपक्रम राबविला.  दिवसभरात या उपक्रमास भेट देण्यासाठी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, शेखर खंडागळे, बाळासो माळशिकारे, मोहन थोपटे यांनी भेटी दिल्या.
To Top