ग्रामपंचायत धुमशान : निरा ८८ पैकी २ अर्ज अवैध, निंबुत व खंडोबाची वाडी सर्व अर्ज वैध
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. १७ सदस्यसंख्य असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल ८८ इच्छुक उमेदवारांनी काल पर्यंत अर्ज भरले. आज ८८ पैकी २ अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे आता नीरा ग्रामपंचायतीच्या पंचवार्शीक निवडणुकीत ८६ उमेदवार रिंगणात शिल्लक राहीले आहेत.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दि.२३ डिसेंबर ते दि.३० पर्यंत अर्ज स्विकारले गेले. दि. २३ रोजी ० अर्ज, २४ रोजी ४ अर्ज, २८ रोजी ६ अर्ज, २९ रोजी ३२ अर्ज आणि ३० रोजी ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काल बुधवार दि.३० रोजी सायंकाळी ५:३० पर्यंत ८८ इच्छुक उमेदवारांनी निवडणूकीसाठी अर्ज दाखल केले होते. आज गुरवार दि. ३० रोजी प्रभाग २ मधिल अनुसूचित प्रवर्गातील एक अर्ज बाद झाला आहे, तर. प्रभाग ३ मधिल नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एक अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता ८६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. दि. ४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दि. ४ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
COMMENTS