प्रसारमाध्यमे शासन, प्रशासन आणि समाज यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करत असतात. पत्रकारांनी समाजाचे प्रतिबिंब म्हणून काम केल्यास खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळेल व समाजातील तळागळातील लोकांचा विकास होईल, असे प्रतिपादन तहसीलदार विजय पाटील यांनी केले.
पत्रकार संघ बारामती , पत्रकार व संपादक सुरक्षा दल बारामती व पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील प्रशासकीय भवनातील बारामती उप माहिती कार्यालयात पत्रकार दिनाचा कार्यक्रम संयुक्तिकरित्या आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बारामती शहर पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,उप माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक रोहिदास गावडे, बारामतीमधील पत्रकार संघांचे अध्यक्ष सुधीर जन्नुप , संतोष जाधव , योगेश नालंदे तसेच अविनाश रणशिंग, राजेश वाघ , तैनुर शेख, अमोल तोरणे, नावीद पठाण, राजेंद्र गलांडे, वसंत मोरे, अनिल पोटरे ,उमेश दुबे, राजू कांबळे, ॲड. तुषार ओहोळ, साधू बल्लाळ, लक्ष्मण भिसे, स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख, अजिंक्य सातकर, तानाजी पाथरकर, दशरथ मांढरे, सुरज देवकाते, निलेश जाधव, विकास कोकरे, विराज शिंदे, राहूल कांबळे, अमोल यादव , फिरोज शेख, बापू शेंडगे, सम्राट गायकवाड, आमिर पठाण, सिकंदर शेख, प्रविण जाधव, संजय भिसे, अभिजीत कांबळे, दया दामोदरे, अजहर शेख, अमोल निलाखे इत्यादी पत्रकार व उप माहिती कार्यालयातील कर्मचारी अमित खडतरे, भीमराव गायकवाड उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले समाजात जे काही घडत आहे, समाजाला काय अपेक्षित आहे ते वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडण्याचे काम पत्रकारांनी करणे आवश्यक आहे. समाजातील समस्या मांडून अस्वस्थता कमी करण्याचे काम पत्रकारितेतून होत असते. पत्रकारांनी नेहमी पारदर्शकता ठेवून कामे केली पाहिजेत. शासकीय योजनांना प्रसिध्दी देणे तसेच त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळवून देण्याचे कामही पत्रकार करीत असतात. परंतू एखाद्या योजनेमध्ये सुधारणा हवी असल्यास ती शासन आणि प्रशासन यांच्या निर्दशनास आणूण देण्याचेही काम पत्रकारांनी केल्यास त्याची निश्चितच प्रशासनाकडून दखल घेतली जाते. आपण जे काही आपल्या लेखणीतून मांडत असतो त्यातूनच समाजाचे हित जोपासले जाते . पत्रकारीतेमध्ये समाजाच्या समस्येची जाणीव झाली पाहिजे , समस्येला वाचा फोडली पाहिजे, वंचित घटकांच्या समस्या आपल्या वृत्तपत्रामधून मांडल्या पाहिजेत. तसेच सर्वांनी समन्वयाची भूमिका ठेवून काम केले पाहिजे , त्यामध्ये समाजाची उन्नती होईल असा हेतू असणे आवश्यक आहे. सध्या जरी सोशल मिडीयाचे प्रमाण जास्त असले तरीही वृत्तपत्रावर समाजाचा अजूनही विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची देखील काळजी सर्व पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. असेही त्यांनी शेवटी सांगून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.मनोज खोमणे , पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे, सामाजिक कायकर्ते श्याम पोटरे , सुधीर जन्नू अमोल तोरणे , योगेश नालंदे, ॲड.तुषार ओहोळ या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तैनुर शेख व संतोष जाधव यांनी केले , प्रस्ताविक सुधीर जन्नू व आभार प्रदर्शन माहिती सहायक रोहिदास गावडे यांनी केले.