भोर : प्रतिनिधी
भोर आणि वेल्हा तालुक्याची महत्वाची बाजारपेठ असलेल्या नसरापूर ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून अकरा जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र उर्वरित जागांसाठी निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार उतरले आहे. उमेदवारांनी प्रचार श्रीगणेशा सुरु केला असून प्रचारात महिलांनी सुद्धा आघाडी घेतली आहे. नसरापूर ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीचा सामना रंगणार आहे.
नसरापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक २ व ३ मध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित १ आणि ४ या वार्डामध्ये चौदा उमदेवार रिंगणात उभे आहे. बुधवारी वार्ड क्रमांक एकच्या उमेदवार व उमेदवारांच्या समर्थक महिलांनी नसरापूर बाजारपेठेत पदयात्रा काढून प्रचारपत्रक वाटप करण्यात आले. यावेळी उमेदवार सुमन घाटे, जमुना गायकवाड, अस्मिता राशिनकर, लक्ष्मी गायकवाड, उज्वला जंगम, चैताली राशिनकर, रुपाली जंगम, प्रतीक्षा राशिनकर, हर्षदा राशिनकर, विशाखा उकिरडे, आनंद गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता. सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सहा जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात आहेत.
चौदा उमेदवारांपैकी नऊ महिला उमेदवार आहेत. यावेळी क्रमांक २ व ३ वार्ड मधील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून वार्ड क्रमांक २ मधून शेटे रोहिणी अनिल, हाडके श्रद्धा संतोष, वाल्हेकर सुधीर सोपान व वार्ड क्रमांक ३ मधून कदम संदीप शंकर व चव्हाण नामदेव आत्माराम हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. वार्ड क्रमांक १ व ४ मध्ये सहा जागांसाठी चौदा उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत ते पुढील प्रमाणे वार्ड क्रमांक मधून कांबळे अश्विनी संदीप, वाघमारे अर्चना प्रफुल्ल, घाटे सुमन संजय, झोरे सपना ज्ञानेश्वर, गायकवाड जमुना सिद्धार्थ, मुलानी इरफान हबीब, राशिनकर सागर सतीश, तर वार्ड क्रमांक चारसाठी झोरे वैशाली अरुण, लष्कर मेघा उमेश, कदम उषा विक्रम, तनपुरे प्रतिभा पांडुरंग, दळवी गणेश सुरेश, बागमार गौरव देविचंद, परदेशी सचिन एकनाथ उमेदवार रिंगणात आहेत.