पत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप

Admin
पत्रकार दिनानिमित्त ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लॅकेट वाटप

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------

आज ६ जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमेश्वर कारखान्यावरील ७० ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले. 
             बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ, एक हात मदतीचा सोशल फाऊंडेशन आणि पुरुषोत्तमदादा जगताप विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, बारामती व इंदापूर युनियन चे अध्यक्ष दिग्विजय जगताप, डॉ सौरभ काकडे, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे, जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर, दत्ता माळशिकारे, adv, गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, चिंतामणी क्षिरसागर, महेश जगताप, युवराज खोमणे, संतोष भोसले, adv, नवनाथ भोसले, परवेज मुलाणी, चांद्रजित जगताप, राजेंद्र बालगुडे, हेमंत गायकवाड आणि आकाश सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
             सोमेश्वर कारखान्याचे संचालक किशोर भोसले यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प काम करत आहे. याठिकाणी मुलांचे लेखन वाचन वर्गाच्या माध्यमातुन मुलांना साक्षर करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करत असल्याची माहिती आकाश सावळकर यांनी दिली. पत्रकार दिना निमित्त आज ऊस तोड कामगारांच्या मुलांना थंडी पासून बचाव होण्यासाठी ब्लेंकेट'चे  वाटप करण्यात आले. यावेळी आशा प्रकल्पातील कार्यकर्ते शरद ननवरे, संभाजी खोमणे, ज्ञानेश्वर पवार, अनिता ओव्हाळ, मोनिका पवार, सुप्रिया जगदाळे, ऋषिकेश जगताप उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक   संतोष होनमाने यांनी केले  उपस्थितांचे आभार नवशाद बागवान यांनी मानले.
To Top