निंबुत ग्रामपंचायत रणधुमाळी : सोमेश्वर परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा नारळ फुटला
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------------
निंबुत ता बारामती येथील निंबुत ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनलचा आज प्रचाराचा नारळ फुटला.
यावेळी राजेंद्र काशीनाथ काकडे ( श्रमवीर उत्कर्ष पतसंस्थेचे चेअरमन ) बांधकाम व्यावसायिक सुजीत सर्जेराव काकडे व विजय विनायकराव काकडे यांनी आज नींबूत ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पैनल च्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमा वेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधे प्रवेश केला.
यावेळी सोमेश्वर कारखान्याने मा अध्यक्ष शहाजी काकडे, गौतम काकडे, दिलीप फरांदे, महेश काकडे, विलास काकडे, अरुण काकडे, विठ्ठल दगडे, वामन बनसोडे, अरुन काकडे, हिंदुराव काकडे, शशीभाऊ काकडे, धैरशील काकडे, विक्रम काकडे , प्रभाकर काकडे, विक्रम फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.