विरोधकांचे एक रूपयाचे काम दाखवा, एक लाख रुपये मिळवा : प्रमोद काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज---------
महाविकास आघाडी पुरस्कृत (राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना) श्री भैरवनाथ
ग्रामविकास पॅनेल निंबुत निबुत ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक २०२०-२५ प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला.
निंबुत येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा
शुभारंभ बुधवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी १० वा श्रीफळ फोडुन व हार अर्पण करून संपन्न झाला. सर्व समाजातील जेष्ठ २१ ग्रामस्थांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषद पुणे चे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य खात्याचे सभापती प्रमोद काकडे होते. त्यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन गावात आणलेल्या विकासाच्या विविध योजना यांची माहिती दिली. तसेच भविष्यात आनंदनगर, लक्ष्मीनगर या ठिकाण महाराष्ट्रात प्रथमच
राबविण्यात येत असलेली तीन मजली घरकुल योजना आणु अशी ग्वाही दिली. व विरोधकांचे १ रूपयाचे काम दाखवा व एक लाख रूपये मिळवा. असे नागरीकांना आवाहन केले तसेच यावेळी निंबुत गावचे
माजी सरपंच राजकुमार बनसोडे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत केलेली विविध विकास कामे याबद्दल माहिती दिली. पशुवैद्यकिय दवाखाना इमारत, सुसज्ज ऑपरेशन थिएटर व निवास व्यवस्था, घंटागाडी, बोअरवेल,
हायमास्ट लॅम्प, सिमेंट रस्ते, भुमिगत गटारे, वीज, स्मशानभुमीचे सुशोभिकरण, वृक्षारोपन, पाणीपुरवठा
याबद्दल माहिती सांगितली. संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक सुशोभिकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
यावेळी पॅनेल प्रमुख सतिश काकडे यांनी आपल्या भाषणात गावातील सर्व जाती
धर्माच्या लोकांना बरोबर घेवुन पॅनेल तयार केले आहे. असे सांगीतले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातुन गावात आणलेल्या विविध योजना यांच्याबद्दल माहिती दिली
तसेच इंद्रसेन संभाजीराव काकडे या छोटया कार्यकत्याने पॅनेलची चिन्हे सांगुन प्रचारास सुरवात केली.
यावेळी श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल निंबुतचे सर्व उमेदवार व गावातील ग्रामस्थ महिला व युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मदन काकडे यांनी केले व आभार शिवाजी
काकडे यांनी मानले.
COMMENTS