श्रद्धा वेताळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज---------
बारामती नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकमधील शिक्षिका श्रध्दा शरद वेताळ यांना 'महाराष्ट्र राज्य नगरपालिका-महानगरपालिका शिक्षक संघ' यांच्या वतीने 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक' पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच देण्यात आला.
श्रध्दा वेताळ यांनी वीस वर्षापेक्षा अधिक काळ सरकारी शाळांमध्ये उत्तम विद्यार्थी घडविले आहेत. सध्या बारामती नगरपालिकेअंतर्गत शाळा क्रमांक एकमध्ये अध्यापन करत आहेत. त्यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने विशेषतः सहावी ते आठवीच्या मुलींसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवून मुलींना स्वयंपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुली ज्वेलरी, घरगुती वस्तू बनवायला शिकल्या. त्यांना श्रध्दा क्रिएशन नावाचा फेसबुक ग्रुप तयार करून वस्तू विक्रीसाठी सहकार्य केले. याशिवाय वेळोवेळी शासनाच्या वतीने होणाऱ्या शिक्षक कार्यशाळांमध्येही वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्तम प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावतात. याशिवाय स्पोकन इंग्लिशचे वर्ग घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणात स्वतःचा युट्यूब चॅनेल तयार करून गोरगरीब मुलांपर्यंत पोचण्याचा प्रय़त्न केला होता.
सदर पुरस्कार देऊन सौ. वेताळ व शरद वेताळ या दांपत्यांना यांना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय जगताप, शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, परीक्षा सहसंचालक मीना शेंडकर, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, शिक्षक संघाचे नेते अर्जुन कोळी आदी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णमा तावरे, प्रशासन अधिकारी पद्मजा दिंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
---
COMMENTS