वडगाव निंबाळकर पोलिसांकडून हातभट्टी व्यावसायिकांवर छापे : चार जणांवर गुन्हे दाखल
मोरगांव : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोरगाव परिसरात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे . मतदारांना ओल्या पार्ट्याची सुरुवात झाली आहे . या निवडणुकीच्या वार्याबरोबर येथे हातभट्टीची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती .या हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या चार ठिकाणी पोलिसांनी छापे मारून मुद्देमालासह आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
याबद्दल सविस्तर वृत्त असे की पश्चिम भागातील तरडोली , मूर्टी आदी भागांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या संधीचा फायदा उठवण्यासाठी काही लोकांनी गावठी हातभट्टीचा व्यवसाय उभा केला होता . हे अवैध व्यवसाय मोरगाव येथील आंबी रोड , नाथाचे मंदिर , शिवशंभो नगर येथे भरवस्ती नजीक तसेच चांदगुडे वाडी गावच्या हद्दीत चांदगुडेवाडी मांगोबाची वाडी रोड लगत ही अवैध दारु विक्री सुरु होती .
संबंधीत घतनेची माहीती समजताच आज वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मोहीते व पोलिस नाईक नांगरे यांनी छापे टाकले. यामध्ये आंबी रोड येथे पाच लिटरची गावठी दारू मुद्देमाल विक्री करत असल्याप्रकरणी देवी पवन राठोड (वय वर्षे 30 रा. वाल्हे ता . पुरंदर )तसेच चांदगुडेवाडी मांगोबाची वाडी रस्त्यालगत गावठी दारू विक्री करणाऱ्या पारस किशोर राठोड वय वर्षे 30 व मैना शेरु राठोड वय वर्षे ६० रा .देहूरोड , पुणे यांव्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तसेच शिवशंभू नगर येथे दारू विक्री करणारी लक्ष्मी शिवाजी राठोड वय वर्ष 35 तर मोरगाव येथील नाथाच्या मंदिरा शेजारी मध्यवर्ती वस्तीत हातभट्टी विकणारे शहाजान आलीमोहम्मद मुजावर वय वर्षे ४० रा . मोरगांव यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे सह पोलीस हवलदार मोहीते व पोलीस नाईक नांगरे करत आहेत . वरील आरोपीं च्या ताब्यातून दोन हजार दोनशे रुपयांच मुद्देमाल जप्त केला आहे .
COMMENTS