आनंदवार्ता...बारामतीकरांसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० लस : दि १६ पासून शुभारंभ

Admin
आनंदवार्ता...बारामतीकरांसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० लस : दि १६ पासून शुभारंभ

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

नव्या वर्षात बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. शनिवारी (दि. १६) पासून पहिल्या  बारामती शहर व तालुक्यातील खासगी तसेच शासकीय सुमारे ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना रूग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये १ व्हॅक्सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत ४ सहकारी असणार आहेत. त्यानुसार २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. १२) पुणे येथे लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील १ हजार २७८ शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवसाला ३०० ते ४०० जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत बारामती मधील कोरोनाचा लसीकरणाचा  पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.  


To Top