अरं.....हो...हो...हो.....घसरली.....: मळीने माखलेल्या रस्त्यावरून शेकडो दुचाकीस्वार घसरून जखमी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज सकाळपासून बारामती तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मात्र मळीने माखलेल्या रस्त्यावरून घसरून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
निरा ते कोऱ्हाळे वानेवाडी ते सोमेश्वर मंदिर या रस्त्यावर दुचाकीस्वार घसरून पडले. तर निरा बारामती रस्त्यावर होळ - आठ फाटा या ठिकाणी सर्वात जास्त नागरिक घसरून पडले आहेत. तर सोमेश्वर कारखाना डिस्टलरी समोर १० च्या वर दुचाकी स्वार घसरले.
बेफाम दुचाकीस्वारांना याचा चांगलाच फटका बसला आहे. काही दुचाकीस्वार तर दहा फुटापर्यंत घसरत गेले. यामध्ये कुणाचा शर्ट फाटला तर कुणाची पॅन्ट फाटली तर कुणाला हाताला लागले, तर कोणाला पायाला, तर अनेक दुचाकींचे नुकसानही झाले आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांचे आवाहन
सर्व नागरिकांना विनंती कि आत्ता सध्या आपलें परिसरात पाऊस पडत आहे तरी रोडवर वाहने सावकाश चालवावी वाहने घसरून पाडण्याचे प्रमाण वाढले आहे तरी वाहने सावकाश चालवावी.