सोमेश्वरनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता बारामती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर पणत्या लावून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे योगदान माहित होण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समीक्षा संध्या मिलिंद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. सावित्रीबाईंनी केलेल्या शिक्षणाच्या कार्याविषयी तसेच स्त्रीभ्रूणहत्या याबद्दलची सखोल माहिती त्यांनी दिली. सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्यात रुजवणे खूप गरजेचे आहे, तसेच सौ. सुचिता साळवे यांनी महिलांना मार्गदर्शन केले, त्या अशा म्हणाल्या की शासनाच्या म्हणण्याप्रमाणे आपण पण हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करीत आहोत. परीसरातील अशिक्षित महिलांना सुशिक्षित करण्याचा संकल्प यादिवशी करू व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ज्ञानगंगा अशीच पुढे नेवू. यानंतर परिसरातील हंसा वाळा यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला ललिता कोळेकर, मनीषा बुंनगे, मंगल भुजबळ .संगीता कांबळे, अनिता ओव्हाळ, पद्मा सावंत, मालन सावंत, अल्का जगताप, .भारती शिंदे व परिसरातील पंचावन्न महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम राबविल्याबद्दल सुचिता साळवे व प्रियंका तांबे यांना महिलांनी धन्यवाद दिला तसेच हा कार्यक्रम राबविण्यासाठी गणपत भुजबळ यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुचिता साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रियंका तांबे यांनी मानले.
COMMENTS