सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात युवा सप्ताह साजरा

Admin
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात युवा सप्ताह साजरा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय सोमेश्वरनगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जाने 2021 रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध विषयावर निबंध स्पर्धा व चर्चासत्राचे ऑनलाइन गुगल मीट च्या माध्यमातून राबवण्यात आले.
         "युवकांमधील वैज्ञानिक दृष्टिकोण"  या विषयाच्या चर्चासत्रामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून श्री अझहर नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले,  त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व पटवून दिले. तसेच अध्यक्ष मनोगतामध्ये महाविद्यालयांचे प्राचार्य  प्रा. धनंजय बनसोडे यांनी आजच्या युवकांमध्ये स्वामी विवेकानंदाचे विचार किती महत्वाचे आहेत हे थोडक्यात विशद केले.  या चर्चासत्रात 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मयुरी यादव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष पिंगळे व कार्यक्रमाचे आभार प्रा. किरण जगदाळे यांनी केले 
         या कार्यक्रमासाठी अजित जगताप ग्रंथपाल प्रा.  रेशमा चाचर , प्रा. अतिश  यादव हे उपस्थित होते.  तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी  यांचे सहकार्य मिळाले.
To Top