हॉटेल मधील कॅप्टन करणार देशसेवा तर : वाणेवाडीची मोनिका पवार हिची आसाम रायफल मध्ये निवड
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विशेष प्रतिनिधी
शाळेत असताना गवंड्याच्या हाता खाली काम करत होतो. काम करत करत शिक्षण घेतले. बारावीत नापास झालो पण हरलो नाही. बारावी पास करत उच्च शिक्षण घेतले. भरपूर ठिकाणी नोकरी शोधली पण नोकरी मिळाली नाही. शेवटी हॉटेल मध्ये काम सुरू केले. हॉटेल मध्ये काम करत असताना अनुभव आला. हॉटेल मध्येच कॅप्टन झालो. पण इथं पण मन रमत नव्हतं. परत गावी आलो . वडिलांच्या सोबत शेतात जायचो. दोन वर्ष अभ्यास केला. मैदानावर सराव केला. घरची गरिबी लहान पणा पासून पहात होतो. ते चित्र बदलायच स्वप्न होत. ते सत्यात उतरलं आणि वर्षा भरा पूर्वी दिलेल्या परीक्षेत यश मिळालं. ही कहाणी आहे वाघळवाडी येथील विशाल भरत जावीर यांची. त्यांची सैन्य दलात निवड झाली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब कष्ट केले तरच उदरनिर्वाह करतात अशी त्यांची परिस्थिती. विशेष बाब अअशी देशभरात सोळा जागा आयटीबीपी यासाठी होत्या त्यामध्ये त्यातून त्यांची निवड झाली आहे.
सोमेश्वरनगर परिसरातील तीन जणांची नुकतीच सैन्य दलासाठी निवड झाली आहे. निवड झाल्याची यादी काल प्रसिद्ध झाली आणि निवड झाल्याची बातमी समजताच परिसरात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
वाणेवाडीतील मोनिका भरत पवार हिची आसाम रायफल मध्ये निवड झाली आहे. बारामती तालुक्यातील ती एकमेव युवती आहे जी आसाम रायफल मध्ये तिची निवड झाली आहे. विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास करत वाणेवाडीत मैदानातील सरावासाठी प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले. तर तिच्या सतत सोबती असलेली मैत्रीण भारती जाधव हिने तिचे मनोबल वाढवत भरती होईपर्यंत साथ दिली. तिची निवड झाल्याची बातमी घरी समजताच वडिलांनी मिठी मारत आनंद अश्रूचा त्यांचा बांध फुटला. तिच्या यशाबद्दल तिच्या घरी अभिनंदन करण्यासाठी जवळच्या घरातील लोकांनी अभिनंदन करत आनंदात सहभागी झाले.महिलाही कुठे कमी नसतात हे तिने मिळविलेल्या यशातून दाखवून दिले आहे.ती सध्या सोमेश्वर कारखान्याच्या ठिकाणी असलेल्या 'आशा' प्रकल्पात ऊसतोड कामगार मुलांच्या सोबत लेखन वाचन घेत अभ्यास वर्गात शिकविण्याचे काम करत आहे.
अजय संजय होळकर यांची बी .एस. एफ मध्ये निवड झाली आहे. ते शेती करत विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास करत बी .एस. एफ मध्ये त्यांची निवड झाली आहे.