वढाणेत माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पॅनल विजयी : माजी उपसरपंच पराभुत
सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
बारामती तालुक्यातील वढाणे येथील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ९ जागांपैकी १ जागा बिनविरोध झाली. तर राहिलेल्या ८ जागांपैकी ६ जागांवर माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या हनुमान परिवर्तन पॅनलने बाजी मारली. तर प्रभाग क्रमांक २ मध्ये भैरवनाथ विकास आघाडीचे माजी उपसरपंच शिवाजी कौले यांना पराभव स्विकारावा लागला.
या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले, माजी सरपंच बी. आर. चौधरी यांनी हनुमान परिवर्तन पॅनलच्या माध्यमातुन ९ पैकी ६ जागा जिंकुन निर्विवाद वर्चस्व मिळावले.
तर येथील भैरवनाथ विकास आघाडीचे पॅनल प्रमुख रामभाऊ लकडे, काशिनाथ चौधरी, मच्छिंद्र चौधरी, बाळासो भोंडवे, ॲड. ज्ञानदेव चौधरी, शंकर लकडे, अर्जुन चौधरी, बाबाजी शिंदे, महादेव कौले, प्रकाश चौधरी यांच्या ९ पैकी ३ जागा आल्याने हनुमान परिवर्तन पॅनलने सत्ताधाऱ्यांचा पराभव केला.
वढाणेतील विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे प्रभाग - १ , भानुदास गणपत चौधरी, रामदास अंकुश चौधरी, लक्ष्मी बापु चौधरी प्रभाग २ - विजय विठ्ठल कौले, प्रगती भानुदास चौधरी, शुभांगी छगन चौधरी, प्रभाग - ३ मधुन गंगुबाई चिमाजी लकडे, सुनिल बाळासो चौधरी तर बिनविरोध म्हणुन पुनम लक्ष्मण लकडे आदी विजयी झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विलास बंडगर यांनी दिली.
येथील भैरवनाथ ग्रामविकास आघाडी आणि हनुमान परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची रंगत पहायला मिळाली. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक ३ मधील एक जागा बिनविरोध झाली आहे. तर प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी तंटामुक्त अध्यक्ष भानुदास भानुदास चौधरी यांना पराभव स्विकारावा लागला. तर या बिनविरोध झालेल्या जागेवरील घरातील तिसरी पिढी ग्रामपंचायतीच्या राजकारणात आली आहे. तर माजी सदस्यांचे पती व विद्यमान सदस्याच्या पत्नीला प्रभाग क्रमांक ३ मधुन पराभव स्विकावा लागला.
..................................
COMMENTS