गणेश शिंदे यांना एमडीआरटी पुरस्कार
सुपे : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील शेतकरी कुटुंबातील गणेश गेनबा शिंदे यांना एलआयसीतील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा एमडीआरटी या पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिंदे हे गेली १४ वर्षे एलआयसी मध्ये विम्याच्या माध्यमातून आर्थिक नियोजनचे काम करत आहेत. शिंदे यांनी का-हाटी गावाला पाच वेळा विमाग्राम करून गावाला २ लाख ५० हजाराचे बक्षीस मिळून दिले आहे.
सन २०२० मध्ये शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल एलआयसी कडून दिला जाणारा एमडीआरटी २०२० या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
बारामतीचे शाखा प्रबधक मुकुंद भाईक, उपशाखा प्रबंधक अविनाश भावे आणि विकास अधिकारी चंद्रकिशोर भोसले यांचे पुरस्काराकामी
विशेष सहकार्य मिळाले. तसेच २०२१ च्या अमेरिकेतील ऑरेन्स येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेमध्ये शिंदे यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
.......................................