हॉटेल मधील महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक
भोर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
नसरापूर येथील एका हॉटेल चालक महिलेशी अश्लिल वर्तणुक करुन विनयभंग केल्या प्रकरणी राजगड पोलिसांनी एकास अटक केली आहे.
प्रशांत व्यकंटराव इंदलकर वय 42 रा. खोपी (नसरापूर) ता.भोर याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे बुधवार ता.13 जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास एका खानावळ चालवणारया हाँटेल चालक महिलेस इंदलकर यांने भाकरीची आँडर दिली यावेळी हाँटेल च्या किचन मध्ये जाऊन सदर महिलेस स्पर्श करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या झालेल्या प्रकाराने सदर महिला भयभित झाली होती तिने या बाबत तीच्या नातेवाईकांना माहीती दिल्यावर नातेवाईकांनी तिच्या समवेत येऊन राजगड पोलिस ठाण्यात इंदलकर विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी तातडीने दखल घेत प्रशांत इंदलकर यास अटक केली असुन त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार पी के भोसले करत आहेत.
COMMENTS