निंबुतच्या निकालानंतर रंगली ह्या छायाचित्राची चर्चा : 'सोमेश्वर' चे आजी माजी अध्यक्ष एकाच पुष्पहारात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
निंबुत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या पॅनेलला १५ पैकी ९ जागा मिळाल्या. तुलनेत सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखालील तरूणांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या.
पहिल्यांदाच सत्ताधारी गटाविरोधात इतक्या जागा प्राप्त करण्याचा मान विरोधी गटाला मिळाला आहे. त्यामुळे विरोधी गटाने सहा जागा मिळूनही जल्लोष करत गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करताना सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना एकाच पुष्पहारामध्ये कार्यकर्त्यांनी अडकविले आणि त्यांचे छायाचित्र घेतले. हे छायाचित्र सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून त्यावरून चर्चा झडू लागली आहे. या छायाचित्रावरून आजी-माजी अध्यक्षांच्या मनोममिलनातून सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे असा राजकीय कयास काढला जात आहे.
COMMENTS