थोपटेवाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा 'नादच खुळा' : निवडून येताच केली पाणीपुरवठा टाकीची सफाई
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागून २ दिवसच झाले असताना थोपटेवाडी ग्रामस्थांनी निवडून दिलेले तरुण सदस्य यांनी थोपटेवाडीतील पिण्याचा पाणी पुरवठा टाकी कित्येक वर्षांपासून गाळाने भरलेली असल्यामुळे ग्रामस्थांना अस्वच्छ पाणी मिळत होते व ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते या सर्व बाबींचा विचार करुन नवनियुक्त युवक सदस्य व त्यांच्यासोबत वस्तीवरील इतर युवकांनी स्वतः टाकीमध्ये उतरुन त्या टाकी मधील गाळ काढून ती स्वच्छ केली.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य संतोष खांडेकर, रेखा बनकर, पृथ्वीराज नलवडे, कमल थोपटे हे उपस्थित होते यावेळी बोलताना सर्व सदस्यांना सांगितले की गेली अनेक वर्षांपासून गंभीर असलेला गावचा पिण्याचा पाणी प्रश्न हा प्रामुख्याने सोडवणार असून यासाठी मा अजितदादांकडे पाठपुरावा करणार आहे तसेच गावातील रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण या गोष्टी पुढील काळात प्राधान्याने सोडवणार असल्याचे सांगितले. कमल थोपटे सदस्य यांचे पती जयवंत थोपटे, दत्ता बनकर उपस्थित होते.
COMMENTS