ऊस वाहतूक दरवाढ करा, अन्यथा २७ पासून वाहतूक बंद : वाहतूक संघटनेचा 'सोमेश्वर' ला इशारा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक संघटनेने बंद चे हत्यार उपसले असून वाहतूक दरवाढ न केल्यास ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत आज संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ऊस वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते. यावेळी सोमेश्वर ऊस वाहतूक संघटनेने सोमेश्वर कारखान्याला दिलेल्या पत्रात म्हनटले आहे, आम्ही वारंवार आपणास वाहतूक दर वाढीचे पत्र देत आहोत, मात्र अजूनही यावर कोणता निर्णय घेतला गेला नाही. तरी सद्याचे डिझेल चे दर, चालक पगार, इन्शुरन्स, टॅक्स, टायर तसेच स्पेयर पार्ट चे दर प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे सद्याच्या दरात वाहतूक करणे परवडत नाही. म्हणून आमच्या पत्राचा विचार करून वाहतुकीत दरवाढ करावी अन्यथा दि २७ पहाटे ४ पासून आम्ही उसवाहतुक करणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे.
प्रदीप काकडे- अध्यक्ष सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतुक संघटना
डिझेलचे दर ५८ ते ६० रुपयांवर असताना वाहतूक दरवाढ केली होती. यामध्ये २५ रुपयांची वाढ झाली असून वाहतूक दरवाढ मात्र तेवढीच आहे. सोमेश्वर कारखाना जिल्ह्यात सर्वच बाबतीत प्रथम निर्णय घेत असतो मंग वाहतूक संदर्भात प्रथम निर्णय का घेत नाही
COMMENTS