स्पर्धा परीक्षा बरोबरच, समृद्धीच्या हातात राजकारणाचा खडू
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
राजकारणात महिला येत नाही याला छेद देत एकवीस वर्षीय उच्चशिक्षित असलेली समृद्धी अंकुश सावंत या शिवसैनिक तरुणीने भोर तालुक्यात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान पटकावला असून स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतानाच अर्थशास्त्र पदवीधर असलेली समृद्धीने राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे.
सात सदस्य जागा असलेल्या देगांव ( ता. भोर ) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसैनिक अंकुश सावंत यांची कन्या समृद्धी मोठया मताधिक्याने निवडून आली असून तालुक्यात सर्वात कमी वयाची सदस्य ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वार्ड १ मध्ये दिग्गज असलेल्या रत्नाबाई यादव व रंजना श्रीरंग यादव यांच्या विरोधात समृद्धी अंकुश सावंत यांची थेट लढत झाली. समृद्धी हिला १९१ मते मिळवून विजयी झाली आहे. पराभूत रत्नाबाई यादव यांना १६२ मते तर रंजना यादव यांना ५१ मते मिळाली. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे आदी शिवसैनिक पदाधिकार्यांनी समृद्धीचे अभिनंदन केले आहे.
भैरवनाथ विकास पॅनेल विरुद्ध जनसेवा महाविकास आघाडी लढत झाली यात जनसेवाचे चार उमेदवार विजयी झाले असून वार्ड दोनमधून शिवाजी पंढरीनाथ यादव ९६, वार्ड तीनमधून मंजूषा सुशील शेलार १३३ व आझम मुलानी १४१ मतांनी विजयी झाले आहे. पॅनेलप्रमुख तुळशीराम सावंत अशोकआबा शेलार, अंकुश सावंत, काका मोहीते, राहूल फणसे, बबूआण्णा यादव सोनू यादव,यांनी काम पाहिले. गावामध्ये महिला सक्षमीकरण करून विकासकामे करणार असून स्पर्धा परीक्षा देऊन एक कर्तव्यदक्ष अधिकारी होणार असल्याची भावना सत्कारप्रसंगी समृद्धीने व्यक्त केली आहे.
COMMENTS