अजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस नीरा शहर उपाध्यक्षपदी निवड
निरा : प्रतिनिधी
निरा ता पुरंदर येथील अजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस नीरा शहर उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली.सासवड येथील जयदीप मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटूकले,पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, कांचन निगडे,राष्ट्रवादी नीरा शहर अध्यक्ष प्रमोद काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.