धाराऊ माताच्या कापूरहोळमध्ये सर्व जागा बिनविरोध
भोर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीराज्यांच्या दुधआई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर धाराऊमाता गाडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कापुरव्होळ येथील ग्रामस्थांनी पक्षीय व वयक्तीक मतभेद बाजुला ठेवुन एकदिलाने गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व नऊ जागा निवड करून ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध केली आहे. निवडणुक बिनविरोध करण्यात महत्वाचा हातखंडा असलेले पकंज उर्फ बाबी गाडे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन होत आहे.
कापूरहोळ ( ता. भोर ) गावच्या विकासाची नवी परंपरा निर्माण करत गावची निवडणुक बिनविरोध केली. गावामधील जेष्ठांनी सर्व विभागाला प्रतिनिधित्व देत गावच्या जानुबाई भैरवनात महाविकास आघाडी स्थापन करून सर्व सदस्यांची निवड केली. यामध्ये
प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण महिलेच्या जागे साठी मंगल संजय गाडे, ना.म.प्र महिला जागेसाठी विनया अनिकेत सपकाळ तर मागासवर्गीय पुरुष जागेसाठी रोहीत सर्जेराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली असून प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण पुरुष जागेसाठी गुलाब उर्फ बंडु बाळासो गाडे, सर्वसाधारण महिला जागेसाठी शोभा आनंदा गाडे, ना.मा.प्र पुरुष जागेसाठी अजित सत्तार शेख यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक तीनसाठी सर्वसाधारण पुरुष जागेसाठी रविंद्र उर्फ पंकज ( बाबी ) एकनाथ गाडे, सर्वसाधारण महिला जागेसाठी सविता विवेक गाडे व प्रज्ञा शरद म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
COMMENTS