'सोमेश्वर' ची निवडणूक तीन महिने लांबणीवर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यातील मुदत संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूका या महिन्यात होतील असं वाटत असतानाच सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबवणीवर टाकल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे.
सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळाची मुदत कोविड मुळे लांबणीवर पडली होती. आता यामध्ये सहकार खात्याने मार्च अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षेवर दुसऱ्यांदा पाणी पडले आहे. ३१ डिसेंबर नंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीला सहकार खात्याने हिरवा कंदील दाखवला होता. आता यामधून सद्या तरी साखर कारखान्याच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
COMMENTS