अज्ञात वाहनाच्या धडकेत वेल्ह्यातील केंद्रप्रमुख ठार
भोर : प्रतिनिधी
शासकीय बैठक उरकून घरी जात असताना पुणे - सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात वेल्हातील पानशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख ठार झाले आहे. दरम्यान, केंद्रप्रमुख यांना एका डॉक्टर दांपत्य प्रवाशी यांनी उपाचाराठी मदत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र यश आले नाही.
तुकाराम भगवान साखरे वय ५५ ( रा. चिखली पुणे ) असे अपघातात ठार झालेल्या केंद्रप्रमुखचे नाव असून ही घटना ६. रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे - सातारा महामार्गावरील शिवरे ( ता . भोर ) येथील नीलकमल हॉटेलच्या समोर घडली आहे. या घटनेमुळे शिक्षकामधून हळहळ व्यक्त होत असून पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या सह लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी आंदरांजली वाहली आहे.
वेल्हा येथील शासकीय बैठक संपल्यानंतर साखरे हे पुन्हा दुचाकीवरून एमएच १४ डीके. ८०३० त्यांच्या चिखली येथील घरी जाण्यासाठी सातारा पुणे बाजूकडून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडक बसली. स्थानिक तरुणांनी रुग्णवाहीका कळविले होते. मात्र रुग्णवाहिका वेळेवर पोहचू शकली नाही. यावेळी महामार्गावरून प्रवास करणारे डॉ. प्रशांत फरांदे व त्यांची पत्नी व नातेवाईक मंगेश यांनी जखमी झालेल्या केंद्रप्रमुख साखरे यांना स्वतःच्या चारचाकी वाहनमध्ये बसवून नसरापूर येथील सिद्धिविनायक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा पूर्वीचे साखरे मयात झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत तुकाराम साखरे वय २७ वर्ष धंदा - नोकरी रा. चिखली पुणे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार सतीश चव्हाण करीत आहे.
COMMENTS