प्रत्येकाने सुरक्षेचे नियम पाळले तर आपण व समाज सुरक्षित राहील : पोळ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जीवनामध्ये सुरक्षा ही महत्वाची आहे प्रत्येकाने सुरक्षेचे
नियम पाळले तर आपण व समाज सुरक्षित राहील. वाहन चालवताना सर्वांनी काळजी
घेवून नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे असे मत परिवहन अधिकारी जयवंत पोळ यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दि.११ रोजी कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा सप्ताह पार पडला या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये परिवहन अधिकारी .जयवंत पोळ यांनी मार्गदर्शन केले
सोमेश्वर कारखान्याने केलेल्या सुरक्षेच्या सुविधेबद्दल व प्रत्येक वाहनांना वाटणेत आलेल्या रिफलेक्टर बद्दल .पोळ यांनी कारखान्याचे कौतूक केले.
कारखान्याचे संचालक सिद्धार्थ गिते यांनी सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक .राजेंद्र यादव यांनी कारखाना राबवित असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमेश्वर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप काकडे होते. या कार्यक्रमासाठी सर्व वाहतूक संघटना पदाधिकारी, वाहन मालक, मुकादम, वाहन चालक, कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगताप व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार अधिकारी डी.पी.निंबाळकर यांनी केले. प्रस्ताविक योगेश पाटील यांनी केले.