वेळूच्या सरपंचपदी कॉग्रेसचे आप्पा धनावडे तर उपसरपंचपदी छाया पांगारे

Admin
वेळूच्या सरपंचपदी कॉग्रेसचे आप्पा धनावडे तर उपसरपंचपदी छाया पांगारे

भोर : प्रतिनिधी

पुणे  सातारा महामार्गालगत असलेली भोर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठीत समजली जाणाऱ्या वेळू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन झाले असून कॉग्रेसची एकहाती सत्ता आली असून भैरवनाथ परिवतर्न पँनलचे आप्पा तानाजी धनावडे तर उपसरपंचपदी छाया ज्ञानेश्वर पांगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वेळू ( ता.भोर ) येथील झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारे, विठ्ठल पांगारे, जीवन धनावडे, चंद्रकांत पांगारे, सोपान पांगारे, गंगाराम जाधव, डॉ. रमेश पांगारे, बाळासाहेब वाडकर, निवृत्ती पांगारे, जगन्नाथ पांगारे, यांच्या नेतृत्वाखाली आप्पा तानाजी धनावडे, छाया ज्ञानेश्वर पांगारे, ईश्वर बबन पांगारे, अमोल बबन पांगारे, सुरेश सोपान पांगारे, संगीता दत्तात्रय पांगारे, पुष्पा लक्ष्मण काळे, सुजाता शशिकांत खुंटे असे अकरा पैकी आठ सदस्य निवडून आले आहे. वेळूमध्ये कॉंग्रेसचा झेंडा फडकल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

वेळूमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच, उपसरपंच निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी आप्पा धनावडे तसेच उपसरपंच पदासाठी छाया पांगारे यांचा एकमेव अर्ज असल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक अधिकारी नयन गिरमे, ग्रामसेवक उल्हास कोरडे यांनी जाहीर केले. बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. वेळूमध्ये अनेक आधुनिक विकासकामे करणार असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामस्थांना सत्कारप्रसंगी ग्वाही दिली. आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, वाडकर, पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांनी पँनलप्रमुख व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
To Top