बालचमूनी साजरी केलेल्या शिवजयंतीने बनेश्र्वर पेराडाईज सोसायटीमध्ये उत्साह

Admin
बालचमूनी साजरी केलेल्या शिवजयंतीने बनेश्र्वर पेराडाईज सोसायटीमध्ये उत्साह

माणिक पवार
भोर : प्रतिनिधी

उभ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने तहानभूक विसरून नसरापूर येथील बनेश्र्वर पेराडाईज सोसायटीमधील बालचमूनी 'जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत मोठया जल्लोषात शिवजयंती साजरी केली आहे. यामुळे अवघ्या सोसायटीमध्ये भगवामय वातावरण निर्माण झाले होते.
 
नसरापूर ( ता. भोर ) येथील नव्याने उभारणी झालेल्या बनेश्र्वर पेराडाईज सोसायटीमध्ये राष्ट्रपती पुरस्कारार्थी शिक्षका अर्चना दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू फिस्के, हर्षद खुटवड, गौरव हर्णे, राजवर्धन पवार, अंश यादव, रजत भिसे, दक्ष यादव, सोहम गायकवाड, तन्मय गुरव, प्रताप सणस, आराध्या गायकवाड, मानवा फिस्के, चेतन किटे, परी गायकवाड, हर्ष महाजन या मावळ्यांनी शिवजयंती मोठया उत्साहात साजरी केली आहे. 

बालचमूनी एकत्र येत सकाळपासून सोसायटीच्या प्रांगणात शिवज्योतीचे व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच संपूर्ण सोसायटी भागात रेली काढून 'जय जिजाऊ, जय शिवराय घोषणा दिल्या. शाहू फिस्के याने शिव मनोगत व्यक्त केले. यावेळी लहान बालकांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक पालक वर्ग आणि नागरिकांनी केले आहे.

To Top