चौथ्या दिवशी उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणूक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावेळी रेकॉर्डब्रेक इच्छुकांची संख्या झाली आहे. गेल्या चार दिवसात एकूण २५० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर आज दुपारी तीन वाजेपर्यंत २०० जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि १५ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सोमेश्वर चे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दि १६ रोजी १८ दि १७ रोजी ३२ तर दि १८ रोजी तब्बल २०० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, गौतम काकडे, शिवाजीराजे निंबाळकर, प्रताप धापटे, बाळासाहेब परकाळे, दौलत साळुंखे, आप्पासाहेब गायकवाड, अनिल चव्हाण, कल्याण भगत, राजेंद्र निंबाळकर, दत्तात्रय ढोले, मनोहर वाबळे, गोरख खोमणे, नवनाथ भोसले, ऋषी गायकवाड यांच्यासह सोमेश्वर च्या आजी माजी संचालकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या वतीने सर्व २१ उमेदवारांचे अर्ज सोमवारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणे चे माजी सभापती दिलीप खैरे यांनी दिली.
सुरुवातीला सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल असे सर्वांनाच वाटत होते मात्र शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे कृती समितीच्या कार्यकर्त्याना संजीवींनी मिळाली आहे. तर दुसरीकडे सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप पक्ष उतरत असून नुकताच पश्चिम महाराष्ट्राचे भाजप चे अध्यक्ष जालिंदर कामठे आणि पुणे जिल्ह्याधक्ष गणेश भेगडे यांनी दि १७ रोजी सोमेश्वर मध्येच मेळावा घेत सर्व पक्षांना एकत्र घेत भाजप कारखाना निवडणूकित सर्वच्या सर्व २१ जागा लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे आता ही लढाई तिरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही २२ तारीख आहे. त्यातच शिवजयंती, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या पडल्याने सोमवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी रांगा लागण्याची चिन्हे आहेत.
COMMENTS