'सोमेश्वर'ची 'गगन भरारी' विशेष पुस्तकीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Admin
'सोमेश्वर'ची 'गगन भरारी' विशेष पुस्तकीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विदयमान संचालक मंडळाने गेल्या सहा वर्षात केलेल्या कामकाजाबद्दलची माहिती एका पुस्तकाद्वारे लिहीली
असुन या विशेष अंकाचे नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या हस्ते बारामती येथील एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
बारामती येथे पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी आदरणीय अजितदादा पवार यांनी कारखान्याची सध्यस्थिती जाणुन घेत गेल्या सहा वर्षात
केलेल्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचे कौतुक करीत सोमेश्वर सर्वच बाबतीत यापुढेही अग्रेसर रहावा यासाठी सर्वांनी काम करावे अशी सुचना केली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादी कॉ. पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे व्हाईस चेअरमन शैलेश रासकर,
संचालक सचिन खलाटे, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव उपस्थित होते.
To Top