मटका व्यवसायकाच्या हाती सोमेश्वर देवस्थानची सत्ता : अजित पवार जरा इकडे पण लक्ष द्या
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान यांची नुकतीच कोणालाही माहीत न होऊ देता निवडणूक पार पडली. मात्र या ठिकाणी सोमेश्वरनगर परिसरात एका प्रसिद्ध मटका व्यावसायिकाची या ठिकाणी विस्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
दर तीन वर्षानंतर सोमेश्वर देवस्थान ची निवडणूक होत असते. मात्र यावेळी परिसरातील नागरिक, देवस्थानचे भाविक, सोमेश्वर कारखाना तसेच पत्रकार यांना कोणालाही माहीत होवू न देता सोमेश्वर देवस्थान ने गपचूप निवडणूक घेतली असल्याच्या आरोप परिसरातुन होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे लक्ष देणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.