सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकित ६३२ पैकी ९४ अर्ज बाद : दिग्गजांची स्वप्न भंगली

Admin
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकित ६३२ पैकी ९४ अर्ज बाद : दिग्गजांची स्वप्न भंगली

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अर्ज छाननीत ६३२ अर्जापैकी तब्बल ९४ अर्ज बाद झाले असून ५३८ अर्ज पात्र झाले आहेत. यामध्ये भाजपचे दिलीप खैरे, पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष दिलीप यादव तर निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांचा समावेश आहे. 
          अर्ज बाद झालेल्यामध्ये दिगजांचा समावेश असून एक गटातून  निरेचे उपसरपंच राजेश काकडे, विक्रम काकडे, संभाजी घाडगे, अनिल चव्हाण, राजेंद्र थोपटे यांच्यासह १४ जणांचे अर्ज बाद झाले, तर गट क्र २ मध्ये सुखदेव शिंदे आणि पोपट कोकरे यांच्यासह एकूण ४ अर्ज बाद झाले आहेत. गट क्रमांक ३ मध्ये एकूण १८ अर्ज बाद, गट क्रमांक ४ मध्ये एकूण ११ अर्ज बाद तर गट क्रमांक ५ मध्ये एकूण १६ अर्ज बाद झाले आहेत. 
           भाजप पक्षाची मदार ज्यांच्या खांद्यावर होती ते दिलीप खैरे यांचाच अर्ज बाद झाल्याने भाजपाच्या गोठात शांतता पसरली. मात्र मी जरी निवडणुकीत नसलो तरी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचे दिलीप खैरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे शेतकरी कृती समितीने या निवडणुकीत दंड थोपटले आहेत.  सतीश काकडे हे राष्ट्रवादी विरोधात पॅनेल उभे करणार का? राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार  ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 
         या निवडणुकीत एकूण ६३२ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यामध्ये ५३८ अर्ज पात्र झाले असून ९५ अर्ज अपात्र ठरले आहेत. 
               दाखल   अपात्र   पात्र
गट क्र - १  १०५      १४      ९१
गट क्र - २    ९३       ४        ८९
गट क्र - ३    ७०      १८       ५२
गट क्र - ४    ६९      ११       ५८
गट क्र- ५     ८८      १६       ७२
ब वर्ग -         २०      -         २०
अनुसूचित जाती जमाती
                   २६      ५      २१
महिला प्रतिनिधी 
                   ६४     ८       ५६
इतर मागासवर्गीय
                  ३०      ८        २२
भटक्या विमुक्त जाती जमाती
                  ६७      १०     ५७

 भाजपला पहिला धक्का..  दिलीप खैरे यांचा अर्ज बाद 
--------------------
आज सोमेश्वर करखान्याच्या निवडणुकीतील अर्जाची छाननी सुरू असून गट क्र- ४ मधून भाजप ला पहिला धक्का बसला असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांचा अर्ज बाद झाला आहे. 
 सलग तीन वर्षे ऊस नआल्याच्या निकषावर खैरे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. 

याच निवडणुकीत कमबॅक करणार - दिलीप खैरे
------------------
कारखान्याची मतदार यादी चुकीची असून लावलेले निकष चुकीचे आहेत. निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली जाते तर मंग याद्या जुन्या का? असा प्रश्न करून चुकीच्या निकषांवर न्यायालयात जाणार आहे तसेच अजित पवार यांच्या दबावाखाली कारखाना व्यवस्थापन निवडणूक निर्णय अधिकारी यांना चुकीच्या माहिती देत आहे. याच निवडणूकित मी निश्चित उमेदवार असणार असे खैरे यांनी स्पष्ट केले.
To Top