४३ पाणीपुरवठा योजनांना महावितरणचा शॉक : सोमेश्वर विभाग १ कोटी ७० लाख थकबाकी

Admin
४३ पाणीपुरवठा योजनांना महावितरणचा शॉक : सोमेश्वर विभाग १ कोटी ७० लाख थकबाकी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------

सोमेश्वर विभागाअंतर्गत येणाऱ्या सोमेश्वर, मोरगाव, सुपा, निरा आणि वडगाव या शाखामधील ४३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करून येन उन्हाळ्यात ग्रामपंचयतींना शॉक दिला आहे.  
            सोमेश्वर विभागाअंतर्गत येणाऱ्या सोमेश्वर शाखेतील ६ पाणीपुरवठा योजना, मोरगाव शाखेतील ३ पाणीपुरवठा योजना, सुपा शाखेतील १४ पाणी पुरवठा योजना, निरा शाखेतील १२ पाणीपुरवठा योजना तर वडगाव निंबाळकर शाखेतील १९ पाणीपुरवठा योजना चा पाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करत ऐन उन्हाळ्यात शॉक दिला आहे. या ४३ पाणीपुरवठा योजनांकडे मिळून १ कोटी ७० लाखांची थकबाकी असून सोमेश्वर शाखेत २३ लाख ९७ हजार, मोरगाव शाखेत ८ लाख ४३ हजार, निरा शाखेत ३८ लाख ७७ हजार, सुपा शाखेत ३० लाख १५ हजार तर वडगाव निंबाळकर शाखेत ६५ लाख ८२ हजार रुपयांची थकबाकी आहे. 
              त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून नागरिकांनी आपला मोर्चा विहिरी आणि निरा डाव्या कालव्याकडे वळवला आहे. ग्रामपंचायतीनी या थकबाक्या लवकर भराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
ग्रामपंचायती काय करतात
---------------
सोमेश्वर महावितरण विभाग अंतर्गत येणाऱ्या गावामधून महावितरणने तब्बल ४३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यातील काही ग्रामपंचयातीचे थकीत बिल १० लाखांच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे बिल येईपर्यंत सदस्य नक्की करतात काय असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. 

सचिन म्हात्रे- उपकार्यकरी अधिकारी सोमेश्वर महावितरण
----------------
ग्रामपंचायतीने सर्व पाणी पुरवठा योजनांची थकबाकी भरू महावितरणला सहकार्य करावे. थकबाकी भारण्यासाठी हप्ते बांधून पाहिजे असल्यास त्यांनी सोमेश्वर येथील कार्यलयाशी संपूर्ण साधावा.
To Top