शिरषणे सरपंच निवड पडली महागात : दहा जणांवर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------
बारामती तालुक्यातील शिरषणे ग्रामपंचायतची आज सरपंच निवड चांगलीच महागात पडली आहे. सरपंच निवडीला बाऊंसर बोलावल्या प्रकरणी दहा जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच होती. सकाळी सरपंचपदाच्या निवडणूकीच्या प्रक्रीयेच्या अगोदर तगड्या प्रकृतीचे दहा बाऊंसर्स अचानकच ग्रामपंचायतीबाहेर येऊन थांबल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे बाऊंसर नेमके कोणी आणले याचा खुलासा झालेला नसला तरी निवडणूकीच्या काळात अशी घटना दहशत निर्माण करणारी असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. बारामती तालुक्यात कोणत्याच निवडणूकीत आजपर्यंत बाऊंसर वापरण्याची प्रथा नव्हती. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत ही घटना घडल्याने याची मोठी चर्चा झाली. बाऊंसर आल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर काही वेळाने पोलिस त्या ठिकाणी पोहचले.
सपोनि सोमनाथ लांडे- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक जमवणे, मास्क न वापरणे, बेकायदेशीर जमाव जमवणे याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.