निंबुतला चाळीस वर्षानंतर विरोधी गटाकडे सरपंचपद : आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष

Admin
 निंबुतला चाळीस वर्षानंतर विरोधी गटाकडे सरपंचपद : आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

संपर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या निंबुत ग्रामपंचायतीचे आज सरपंच व उपसरपंच निवड पार पडली. सरपंचपदाचा सत्ताधारी गटाचा उमेदवारच पराभूत झाल्याने सरपंचपदाची माळ विरोधी गटाच्या उमेदवारांच्या गळ्यात पडली. 
           पंधरापैकी नऊ जागा जिंकून देखील भैरवनाथ पॅनेलला उपसरपंच पदावर समाधान मानावे लागले. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या नेतूत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने १५ पैकी ९ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता जरी स्थापन केली असली तरी देखील भैरवनाथ पॅनेलचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाल्याने नऊ जागा जिंकून देखील सत्ताधाऱ्यांच्या पदरी निराशा पडली. आज झालेल्या निवडीत सत्ताधाऱ्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागले. 
          तर दुसरीकडे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, गौतम काकडे, बी जी काकडे, विजय काकडे, दिलीप फरांदे, महेश काकडे, धैर्यशील काकडे, उदय काकडे, राजेंद्र काकडे, शशिकांत काकडे, सुजित काकडे व विजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवला गेला. अनेक तपानंतर विरोधी पॅनेलने सहा जागा जिंकत घुसखोरी केली . या सहा जागा जिंकत सरपंच पदाचा उमेदवार निवडून आणल्याने आज निर्मला काळे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. 
            निवडीनंतर सोमेश्वर परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली.
To Top