'वाणेवाडी'च्या ग्रामसेविका 'असून अडचण नसून खोळंबा' : गावाच्या आर्थिक व्यवहाराला खीळ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ग्रामपंचयात मधील ग्रामसेवक ह्या गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून पंचायतीचे आर्थिक व्यवहार स्वीकारत नसल्याने गावाच्या आर्थिक व्यवहाराला खीळ बसली आहे.
वाणेवाडी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामसेवक च्या मनमानी कारभारामुळे सदस्यांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. यावर ग्रामसेवक पी के गाढवे यांनी चुकीच्या कामांना मदत करत नसल्याने माझ्या विरोधात तक्रार केली असल्याचे गाढवे यांनी स्पष्ट केले होते. पूर्वीचे ग्रामसेवक गाढवे यांनी वादावादी मुळे २५ ऑक्टोबर पासून रजा टाकली आहे. त्यानंतर बारामतीचे बीडीओनी ग्रामपंचायतीचे काम थांबू नये म्हणून गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून एका महिला ग्रामसेवीकेची नेमणूक केली आहे. मात्र ह्या महिला ग्रामसेवक आर्थिक व्यहवार हातात घेत नसल्याचे समजत आहे. त्यामुळे ग्रामपंचयातीच्या आर्थिक व्यहावराला मात्र खीळ बसली आहे. यामुळे सर्वांचीच पंचायत झाली आहे. खरेदीची बिले, किरकोळ दुरुस्ती ची बिले, कामगार पगार कोणतेच आर्थिक व्यवहार होत नसल्याचे दिसत आहे.
तीन महिन्यापासून कामगार पगार थकले
पूर्वीचे ग्रामसेवक गाढवे यांनी २० ऑक्टोबर पासून रजेवर गेल्यामुळे व नवीन ग्रामसेविका आर्थिक व्यहवार हातात घेत नसल्याने ग्रामपंचायत कामगारांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याच्या वेतनापासून वंचित ठेवले गेले आहे.