'रागिनी फाऊंडेशन'च्या माध्यमातून ४२५ साड्यांचे वितरण : साडी बँक उपक्रम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती येथील रागिनी फाऊंडेशन च्यावतीने
"साडी बँक" या उपक्रमाची सुरुवात दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली होती. यानिमित्ताने साड्यांचे संकलन करण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले, या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती आणि परिसरातील महिलांनी व त्यांच्या बचत गट, सोसायटी तसेच विविध महिला मंच यांनी या उपक्रमांमध्ये ४२५ साड्यांचे संकलन केले होते.
या साड्यांचे वाटप नुकतेच सोमेश्वर कारखाना तळावरील ऊस तोड करणाऱ्या महिलांना करण्यात आले. महिलांसाठी साडी ही आवश्यक बाब असून, अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मधील एक घटक आहे, त्यामुळे समाजातील महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्याकडे असणाऱ्या जास्ती च्या साड्या 'साडी बँक' या उपक्रमात दान कराव्यात,
इतर महिलांना त्याचा वापर होऊ शकतो, वस्त्र ही त्यांची गरज पूर्ण होऊ शकते. या उद्देशाने साडी बँक हा उपक्रम सुरू केला असल्याचे रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी साडी वाटप कार्यक्रमात सांगितले सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे 75 साड्या वंचित महिलांना भेट दिल्या तर सोमेश्वर साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे मजुरांच्या कोप्यांवर जाऊन 350 साड्या भेट देण्यात आल्या. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणाऱ्या आशा प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांचे यासाठी सहकार्य झाले.. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तरित्या उपस्थितीती दर्शवली. या उपक्रमासाठी रागिनी फाऊंडेशनच्या साक्षी आंबेकर, दीपाली पवार, ज्योती बोधे, वनिता जाधव, सुजाता जाधव यांनी मदत केली. कार्यक्रमासाठी दिनकर आगम,मच्छिंद्रनाथ म्हेत्रे तसेच आशा प्रकल्पाचे प्रमुख संतोष शेंडकर, अझहर नदाफ उपस्थित होते.