उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस : उद्या या दिग्गजांचे अर्ज दाखल होणार

Admin
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस : उद्या यांचे अर्ज दाखल होणार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------


सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून उद्या एका  दिवसात तब्बल २०० ते २५० उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. 
         दि १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या चार दिवसात रेकॉर्डब्रेक इच्छुकांची संख्या झाली आहे. २५० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर दि १८ रोजी या एकाचा दिवसात २०० जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
          सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि १५ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सोमेश्वर चे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दि १६ रोजी १८अर्ज, दि १७ रोजी ३२ अर्ज तर  दि १८ रोजी तब्बल २०० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, गौतम काकडे, शिवाजीराजे निंबाळकर, धर्यशील काकडे, प्रताप धापटे, बाळासाहेब परकाळे, दौलत साळुंखे, आप्पासाहेब गायकवाड, अनिल चव्हाण, कल्याण भगत, राजेंद्र निंबाळकर, दत्तात्रय ढोले, मनोहर वाबळे, गोरख खोमणे, नवनाथ भोसले, ऋषी गायकवाड यांच्यासह सोमेश्वर च्या आजी माजी संचालकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या वतीने सर्व २१ उमेदवारांचे अर्ज सोमवारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणे चे माजी सभापती दिलीप खैरे यांनी दिली.

उद्या सकाळी सात पासूनच रांगा
दि १५ ते १८ या चार दिवसात तब्बल २५० उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. त्यानंतर दि १९ ते २१ अशी तीन दिवस सुट्टी पडल्याने अनेक इच्छुकांच्या उमेदवरी अर्ज दाखल करण्याच्या मान्सुब्यावर पाणी पडले. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची सकाळी सात पासूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. उद्या शेवटच्या दिवशी २०० ते २५० उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 
To Top