अबबब....... 'सोमेश्वर' च्या इच्छुकांची तोबा गर्दी : सकाळी १० वाजताच १५० च्या वर रांग

Admin
अबबब....... 'सोमेश्वर' च्या इच्छुकांची तोबा गर्दी : सकाळी १० वाजताच १५० च्या वर रांग

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तोबा गर्दी करत सकाळी १० वाजताच १५० च्या वर इच्छुकांनी रांग लागली आहेत.
 सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आज एका  दिवसात तब्बल २०० ते २५० उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र सकाळी १० वाजताच १५० च्या वर इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी बारामती येथे पोहंचले  आहेत. 
         दि १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या चार दिवसात रेकॉर्डब्रेक इच्छुकांची संख्या झाली आहे. २५० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर दि १८ रोजी या एकाचा दिवसात २०० जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि १५ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली.      
भाजपच्या वतीने आज सर्व २१ उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणे चे माजी सभापती दिलीप खैरे यांनी दिली.
To Top