सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार!!

घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार!!

माणिक पवार
भोर : प्रतिनिधी

सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे ही पाहायला मिळाल, पुणे तिथे काय उणे, पाटलाचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा कमेंट्सने तर हाहाकार माजवला आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱ्यांनाच चिंतेत पाडले आहे. असा हा घटस्फोट सोहळा साऱ्यांनाच अचंबित करून सोडणारा आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून  'मंगलाष्टक रिटर्न' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या चित्रपटा अंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर हाहाकारच माजवला आहे त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री  श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या ही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.

मिळालेल्या माहितनुसार,लॉकडाउननंतर चित्रपट सृष्टीला मिळालेल्या ग्रीन सिग्नल दरम्यान या 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला.  

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीची धुरा निर्माता वीर कुमार शहा यांनी सांभाळली आहे. त्यांच्या 'शारदा प्रॉडक्शन' या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'बाजार' या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. 'बाजार' या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला 16 अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांचा 'मंगलाष्टक रिटर्न' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे या अचंबित करून टाकणाऱ्या सोहळ्याची नेमकी कथा काय असेल याची साऱ्या सिनेरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आता हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस केव्हा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार!!
घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार!!
https://lh3.googleusercontent.com/-hSGBiA7F9rA/YDOhJcwzsMI/AAAAAAAAIyQ/H4usne3TbnwfgZznE3c2B8OSnccV9sfRgCLcBGAsYHQ/s1600/1613996318254746-0.png
https://lh3.googleusercontent.com/-hSGBiA7F9rA/YDOhJcwzsMI/AAAAAAAAIyQ/H4usne3TbnwfgZznE3c2B8OSnccV9sfRgCLcBGAsYHQ/s72-c/1613996318254746-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/02/blog-post_22.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/02/blog-post_22.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy