सामाजिक कार्यकर्ते संजय सणस यांचे निधन

Admin
सामाजिक कार्यकर्ते संजय सणस यांचे निधन

भोर : प्रतिनिधी

मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले नसरापूर ( ता. भोर ) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तुकाराम सणस यांचे नुकतेच  अल्पशा आजाराने वयाच्या ४९  व्या वर्षी निधन झाले आहे. मोठया शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

संजय सणस यांचे परिसरातील  नागरिकांशी दांडगा जनसंपर्क होता. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रीय सहभाग घेत असे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले, सून विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कारवेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. 


To Top