बळीराजाच्या विकासासाठी तरुणांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद : शशिकांत शिंदे

Admin
बळीराजाच्या विकासासाठी तरुणांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद : शशिकांत शिंदे

माणिक पवार
भोर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक सुविधा लवकर मिळत नाही यामुळे त्यांचे नुकसान होते यासाठी स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन शेतकऱ्यासाठी जास्तीजास्त चांगल्या सोयीसुविधेचा शेतकरी माँल चालु केल्याने निश्चित कौतुकास्पद बाब असुन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे माजी जलसंपदामंत्री, आमदार शशिकांत शिेदे यांनी दिली
शेतीपूरक सर्व साहित्य एकाच छताखाली ब्रीद घेऊन तरुण उद्योजक संतोष बागल, लहु साळुंके, हनुमंत काऱभळ यांनी एकत्र येत परिसरातील शेतकऱ्यांना माफक दरात योग्य सुविधा मिळण्यासाठी संगमनेर माळवाडीफाटा ( ता.भोर) 
बालाजी अँग्रो माँलची सुरू केलेल्या माँलच्या शुभारंभप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी  कामगार नेते ऋषिकांत शिंदे, रुपेश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, माजी उपसभापती रोहीणी बागल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, भिमआर्मीचे महेंद्र साळुंखे, बळीराजा शेतकरी संघटनेचे राजेंद्र कोंडे, सचिन बांदल, नितीन बांदल, महेश मरळ, गणेश सातव, अनिल सातव, राहुल सातव, सोमनाथ निगडे, नितीन दामगुडे, कापुरव्होळचे उपसरपंच पंकजबाबी गाडे, अनिल सावंत, उद्योजक योगेश अहिरे, गणेश सावंत, रवी नांदे, सर्जेराव गोरड, काळुराम मळेकर, माऊली पांगारकर, संजय शिर्के, मुकेश भरेकर उपस्थित होते.

शशिकांत शिंदे यांनी शेतकरी माँलला शुभेच्छा देताना शेतकऱ्यासाठी योग्य सुविधा मिळुन परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी या माँलचा हातभार लागून सेवा येथे मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत उद्योगाच्या जादा शाखा होऊन शेती व शेतकऱ्यांची सेवा या तरुणांच्या हाताने घडावी अशा शुभेच्छा दि्ल्या. गणेश बागल व हनुमंत कारभळ यांनी सर्वांचे स्वागत केले तर संतोष बागल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले तर आभार लहु साळुंखे यांनी मानले.


To Top