'सोमेश्वर'च्या निवडणुकीत पॅनल उभे करणार - दिलीप खैरे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आणि सर्वपक्षिय लोकांना एकत्र आणत कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करणार असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी सांगितले.
आज ते सोमेश्वर रिपोर्टर शी बोलत होते, ते पुढे म्हणाले सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रातील सर्व समविचारी आणि सर्वपक्षीय लोकांना विचारात घेऊन आम्ही सोमेश्वर च्या निवडणूकित उतरत आहोत. याबाबत आजच सर्वांशी संपर्क झाला असून निवडणुकीबाबत वरिष्ठांशी बोलणी सुरू आहे.
सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रातील जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, पि के जगताप, अशोक खलाटे, आर एन जगताप, गिरीश जगताप, आदिनाथ सोरटे, खलील काझी, शिवदास तांबे, दयानंद चव्हाण, प्रा बाळासाहेब जगताप, पिसाळ सर या सर्वासह कार्यक्षेत्रील सभासदांशी विचारात घेऊन हा निर्णय घेत आहोत, एकाच विचारांची मक्तेदारी तोडून काढण्यासाठी आणि सोमेश्वर वाचवण्यासाठी पॅनल उभे करत असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले.