मु. सा. काकडे महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

Admin
मु. सा. काकडे महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
         कार्यशाळा मु. सा. काकडे महाविद्यालय आणि अनेकांत इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन अनेकांत इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांनी केले. तर प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. उमेश कोल्लीमठ यांनी केले. मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाला शुभेछा दिल्या. व या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या कार्यशाळेमध्ये विविध वकत्यांनी मार्गदर्शन केले. 
या प्रसंगी डॉ. एम. ए. लाहोरी  यांनी व्यक्तीमत्व विकास कसा घडवून आणावा या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच व्यक्तीमत्व विकासासाठी व संप्रेषणासाठी आवश्यक असणारी कौशल्य वाचन, चिंतन, विचार मंथन अभिव्यक्त होणे गरजेचे आहे असे सांगितले. 
          डॉ. ए.वाय. दिक्षीत यांनी नोकरीतील सुसंधी आणि स्वपरिचय पत्र या विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये स्वत:ची  उज्जवल प्रतिमा, कौशल्य वापरुन उत्कृष्ट स्वपरिचय पत्र तयार करून नोकरीची संधी मिळवावी असे असे सांगितलेले.
 डॉ. डी. पी. मोरे यांनी मुलाखत तंत्र याविषयी मार्गदर्शन केले. यात मुलाखतीची  तयारी कशी करावी आणी मुलाखतीला सामोरे जाताना आपण ईतरांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यातील वेगळेपण दिसले पाहिजे असे नमूद केले. शेवटी विद्यार्थांच्या शंका-समाधानाचा कार्यक्रम झाला.  महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. आदिनाथ लोंढे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सहसचिव  सतीश लकडे, कार्यालय अधिक्षक  शिवाजी नेवसे, उपप्राचार्य डॉ. जे. एम. साळवे, उपप्राचार्य डॉ. जया कदम, डॉ. राहुल खरात तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौशल्य विकास कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेसाठी ऑनलाईन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
To Top