बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गावडे तर उपसभापतीपदी सणस
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचनेनुसार सभापती पदी पारवडीचे वसंत बाबुराव गावडे व उपसभापतीपदी सोनकसवाडीचे दत्तात्रय गणपत सणस यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली यांनी याबाबत निवडीचे पत्र दिले. सदरची निवडणूक ही बिनविरोध पार पडली. यावेळी मावळते सभापती अनिल खलाटे, उपसभापती .बाळासाहेब पोमाणे, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रदीप धापटे, पंचायत समिती सभापती निताताई बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS