त्रिमूर्ती क्रिकेट क्लब गौतमभैय्या युवा चषकचा मानकरी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
युवानेते गौतमभैय्या काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात सोमेश्वरनगरच्या त्रिमूर्ती क्रिकेट क्लब ने प्रथम क्रमांक मिळवीत १५ हजार रोख, चांदीची गदा व चषक पटकावला.
२५ फेब्रुवारी पासून या क्रिकेट सामन्याना सुरुवात झाली होती. यामध्ये पुणे, सातारा, इंदापूर, कराड, पाटण, पुसेगाव, भिगवण, वाल्हे, सासवड, दौडज, लोणंद, वाठार, जिंती, फलटण, बारामती या ठिकानावरील जवळपास शंभरच्या वर संघांनी साहभाग घेतला होता. यामध्ये मोठया गटाला ४१ हजारांचा बक्षिसांसह चांदीची गदा व चषक ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक १५ हजार, द्वितीय ११ हजार, त्रितीय ७ हजार, चतुर्थ ५ हजार तर पाचवे ३ हजार तर लहान गटात प्रथम ३ हजार व द्वितीय २ हजारांच्या रोख राकमेसह चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
बक्षीस मिळविणारे संघ पुढीलप्रमाणे---------
त्रिमूर्ती क्रिकेट - प्रथम
नक्षत्र कन्ट्रक्शन - द्वितीय
किंग देवा ग्रुप - त्रितीय
देवा ग्रुप - चतुर्थ
त्रिमूर्ती क्रिकेट - पाचवे
लहान गट----------
शौर्यजीत यंग सर्कल - प्रथम
नवकृष्ण क्रिकेट - द्वितीय
सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी शर्यत चालक मालक संघटना यांच्या वतीने या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
COMMENTS