आधुनिक तंत्रज्ञान वापरून चेहऱ्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी : सोमेश्वरनगर येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----------
पुणे याठिकाणी रोड अपघातानंतर तोंडाचा पूर्ण जबडा व इतर हाडे मोडल्याने सदर रुग्णास पुणे येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते परंतु शस्त्रक्रियेचा खर्च ऐकून रुग्णाच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी आयसीयू या हॉस्पिटलने या रुग्णाचे अत्यंत माफक फी मध्ये शस्त्रक्रिया करून ती यशस्वी देखील करून दाखविली आहे.
सदर रुग्णाची शस्त्रक्रिया ही पूर्ण गुंतागुंतीची होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आई सी यु मधील डॉ विद्यानंद भिलारे व डॉ राहुल शिगटे यांना फोन करून सदर परस्थिती सांगितली व पुढील उपचार आणि ऑपरेशन खर्चाअभावी इथे करावे अशी विनंति केली. डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून झटपट तशी तयारी सुरू करून डॉक्टरांचे पुण्यातील नामांकित मित्र सर्जन डॉ प्रतीक राऊत यांना गावाकडे येऊन नाममात्र शुल्क घेऊन ऑपरेशन करण्याची विनवणी केली आणि त्यांनी आनंदाने डॉक्टरांच्या विनावणीस मान देत येण्याचे दर्शविले.
ऑपरेशन चा दिवस उजाडला पूर्ण स्टाफ ने धावपळ करून सुसज्ज तयारी केली आणि ऑपरेशन सुरू झाले , तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ऑपरेशन यशस्वी पार पडले आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.
ग्रामीण भागात उच्चतम प्रतीच्या सुसज्ज अश्या सुविधायुक्त साई सेवा हॉस्पिटल ने गेल्या तीन महिन्यात उत्तम, दर्जेदार व अत्यंत माफक दारात सेवा देत हजारो रुग्णांवर समाधानी उपचार केले आहे तसेच आसपासच्या परिसरात कमी कालावधीत प्रसिद्धी व विश्वास संपादन केला आहे.
COMMENTS