सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी निलेश गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच वैभव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामपंचायत करंजेपुल च्या उपसरपंचपदी निलेश विठ्ठल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या मुदतीमध्ये निलेश गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी काळभोर यांनी घोषित केले.यावेळी अनिल गायकवाड,सागर गायकवाड,अजित गायकवाड, सुहास गायकवाड,मंगेश गायकवाड, हरिष गायकवाड,नाना गायकवाड, भानुदास गायकवाड,समीर शेंडकर यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
ऋषी गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच कारखान्याचे माझी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
गावच्या विकासासठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विकास निधीतून अधिकचा निधी मिळऊन गावचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित उपसरंच निलेश गायकवाड यांनी व्यक्त केले.