नीरा ग्रामपंचायतीने पाणीपुरवठयाचे पाऊने दोन कोटी थकवले : वीज तोडली
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणारे तीन ठिकाणचे वीज कनेक्षण आज गुरवारी संध्याकाळी तोडण्यात आले आहे. महावितरणचे १ कोटी ९० लाखांच्या वर असलेली थकबाकी गेली कितेक वर्ष थकीत ठेवल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज बंद केली. त्यामुळे पाणीपुरवठा विसकळीत होणार आहे.
नीरा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी गेली दहा ते बार वर्ष पाणीपुरवठाचे कोट्यावधी रुपये थकवले आहेत. दर मार्च अखेरला अशा पद्धतीने महावितरण कनेक्षण तोडते, त्यानंतर थोडीफार रक्कम भरली जाते व वर्षभर पुन्हा थकबाकी तशीच ठेवली जाते. हे आता नित्याचेच झाले आहे. पुढील दोन दिवस पाणीपुरवठा वितरणावर याचा परिणाम होणार आहे.
वीज तोडल्याबाबत नीरेच्या ग्रामसेवकांना विचारले असता, ते म्हणाले मिळकतदारांकडे असलेल्या थकबाकी वसुली सुरु आहे. मोठ्या रक्कमा येणे बाकी आहे. दोन दिवसांत काही रक्कम महावितरणकडे भरून वीज कनेक्षण नियमित केले जाईल. त्यानंतर नियमितपणे पाणीपुरवठा सुरळीत होईल. मिळकतदारांनी आपल्या मिळकतींची घरपट्टी, पाणीपट्टी तातडीने भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आव्हाण ग्रामसेवक मनोज डेर यांनी केले आहे.