सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यातील १८९ सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांपैकी १०१ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून यामध्ये ९५ खाजगी आणि ९४ कारखान्यांनी मिळून १०० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असूनही ८८ कारखान्यांची धुराडी सुरू आहेत.
कोल्हापूर विभागातील ३७ साखर कारखान्यांपैकी ३० कारखान्यांचा हंगाम संपला आहे.
पुणे विभागातील ३१ कारखान्यापैकी ९ कारखान्यांचा हंगाम संपला आहे, सोलापूर विभागातील ४२ कारखान्यांपैकी ४१ कारखान्याचा हंगाम संपला आहे. अहमदनगर विभागातील २६ पैकी ७ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. औरंगाबाद विभागातील २२ पैकी २ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. नांदेड विभागातील २५ साखर कारखानापैकी ९ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अमरावती विभागातील २ पैकी २ ही कारखान्यांचा हंगाम संपला आहे तर नागपूर विभागातील ३ कारखान्यांपैकी १ साखर कारखान्याचा हंगाम संपला आहे